शिकणे शिकवणे शिकत राहणे...

शाळेत कुठल्यातरी वर्गात फळ्यावर हा सुविचार लिहिलेला वाचला होता.

"Sky is the limit"


त्यावेळी आपल्या भाबड्या मनाला वाटलेल की काय विचार आणि कल्पना आहे, एकदम भन्नाट ना, ज्याने कोणी हे लिहिले असेल त्याची.


तर आज असं वाटतंय की अपुऱ्या ज्ञानातून येवू शकतो का कधी अज्ञाताला ज्ञात समजून त्याच्यात उड्या घेण्यासाठीचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. म्हणजे कसं तर, sky has limit ना… आता जे दिसतंय आपल्या डोळ्यांना, आपल्या समक्ष, जे वेधून घेतलंय पक्षांनी, कित्येक प्रकारच्या वायूंनी मर्यादा आहेच की त्या sky ची. त्याच्या परे आहे ना अथांग... ज्याचा उगम आणि अंत आपल्याला माहीत नाही असे. Theories आहेत खूप साऱ्या पण कसं आहे ना आपल्याला माहिती असलेलं हे विश्व हे फक्त ५% आहे आणि ज्याची काहीच कल्पना नसलेले असे around 70% is dark energy and 25% is dark matter. 


विज्ञानातील खूप साऱ्या संकल्पना जेव्हा शिकवायची वेळ आली मुलांना तेव्हा ही असच काहीच वाटत राहिलेलं मनात. माती, पाणी, वृक्ष, हवा, सूर्यप्रकाश, ह्यांना नक्की कसं कोणत्या बेसिसवर Renewable, non-renewable किंवा exhaustible, non-exhaustible की conventional, non-conventional म्हणायचं. पाण्याच्या बाबतीत तर मस्त वादविवाद सुरू झाला होता त्यावेळी वर्गात. मग हवेनेही शेपूट पकडलेल. तोपर्यंत घंटा झाली आणि आमची विज्ञान शिकण्या शिकवण्याची वेळ संपली… पण नाही संपत नाही कधीच शिकायची, सुधारायची आणि सुधारून घ्यायची वेळ.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मासिक पाळी आणि अनुभव (period)

Lincoln Newton and Education in my thoughts

From a fighter mummy cat