मासिक पाळी आणि अनुभव (period)
लिहायला सुरुवात करताना खूप मोठा प्रश्न हा होता की इंग्लिश मध्ये लिहू की मराठी? मुख्यत्वे लिहिते ती भाषा जी भावनेने पकडलेली असते तीच राहते, पण आज पडला हा प्रश्न. आज पहिल्यांदाच आपल्या जवळच्या लोकांनी म्हणजे नात्यातल्या, घरच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शाळेतल्या हे वाचावं असं वाटतंय.
आज "Menstrual Hygiene Day" म्हणजे "मासिक पाळीचा दिवस". इंस्टग्रामवर एका सीनिअर ची स्टोरी पाहिली. मनातलंच लिहिलं होतं तिने. एक प्रश्न होता की तुम्हाला तुमची पहिली पाळी झाली तो म्हणजे पिरेडस आले तो दिवस आठवतो का? आणि तो तुम्हाला सक्षम करणारा होता की लाज वाटवणारा?... आशा आहे की ह्याच बरोबर उत्तर तुम्ही गेस केललं नसावं. कारण मला लाजवणारा दिवस होता तो. खजील झाले होते मी. स्वतःपासून आणि त्या ओल्या, उबदार आणि विचित्र जनिवेपासून दूर कुठेतरी पळून जावं ही इच्छा होती तेव्हा मनात. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आज पिरेडस आले आणि उद्या सुट्टी संपणार होती. बापरे परत नवोदयला हॉस्टेलला जायचं. खूप भीती होती मनात. खरंतर आई बाबांना सोडून त्या हॉस्टेलला जायचं हिच मोठी भीतीदायक गोष्ट असायची माझ्यासाठी अगदी बारावीला गेले तोपर्यंत आणि त्यात आता हे नवीन संकट. बाबा म्हणजे तत्वांचे पक्के. शाळेला वेळेतच जायचं. त्यांनी मला विचारलं करशील ना सगळं व्यवस्थित, कळतं ना तुझं तुला सगळं?... मी काय गुणी लेक, गेले सुट्टी संपवून with newly bleeding vagina हॉस्टेलला परत.
लेट्स फिगर आऊट की आयुष्यात किती आणि कोणती कोणती संकट होती तेव्हा आणि कित्येक वेळेसोबत वाढली पण.
1. घर सोडून हॉस्टेल ला जाणं. मला हे ज्यास्त जीवावर यायचं कारण तिथं जिव्हाळ्याच कोणी नव्हतं माझ्या. आठवितली पोर ती. एखादी जिवाभावाची म्हणतात तशी मैत्रीण असती तर हा प्रश्न सुटला असता.
2. आपल्याला पिरेड आलेत हे कोणाला कळू नाही देणं. चक्क एकदा नववीत की दहावीत जेव्हा ह्या विषयाचा मनातला संकोच कमी झाला आम्ही मैत्रिणी हे जाणून घेत होतो की कोणाला कधी पिरेडस आलेले आणि मग बाकीच्यांना कसं काहीच कळलं नाही. आता शाळेत ज्यात्या वेळी पाळीसंबंधी आणि त्याच्याशी निगडित टॅबू व खरोखरीच घ्यायची काळजी ह्याबद्दल एखादी बैठक सुद्धा झाली असती तरी ही समस्या सुटली असती. (इंफॉरमल बैठका नव्हे फॉर्मल)
3. sanitary napkins वापरतात कशे?.. येस, माझ्या आसपास तेव्हा menstrual pad वापरणार घरी कोणीच नव्हतं. सगळ्या प्रयोगांमध्ये एक पॅड खराब झालं चक्क. शेवटी ते पॅकेट स्वतःच्या हातात घेत, thanks to me being literate मी त्याच्यावर ज्या सूचना होत्या वाचल्या आणि झगडत असणाऱ्या दोन मोठ्या बायकांना पण सांगितलं की हे असं करायचं होतं. नो वंडर तेव्हा पण त्यांच्या चेहऱ्यावर पोरगीला किती कळतं हे कौतुकाचे भाव होते…. आता हि तर समाजात खोलवर रुजलेली गंभीर समस्या आहे. चर्चा, संवाद आणि वैज्ञानिक अचूक माहिती ह्यानेच काय ती बरी होईल.
4. एकदा आले आणि त्यानंतर चक्क आलेच नाहीत हो सहा महिने. आणि आठवीच्या पुस्तकात ओझरत जे अभ्यासाला होत त्याच्यात तर लिहिलेलं की दर महिन्याला येतात ते पिरेडस. मग काय जसा महिना संपला मला वेगळीच भीती की आता काय झालं आपल्याला? आपण ठीक तर आहे ना?.. पण कोणाला काय विचारते. घासच नव्हता कोणाला बोलायचा. पालक भेटीची ओढ लागलेली फक्त, की आई दर्शनच सोडवेल आपल्याला ह्यातून. (कॉईन बॉक्स वर दोन मिनिट एवढ्या गर्दीत काय बोलणार आणि पत्र ऑफिस मध्ये वाचली जातात असं पण कुठून कळलेलं)
5. नवोदय मधला एक मोठा इश्यू असायचा ते पॅड्स डीस्पोज करणं. खूप साऱ्या लॅट्रिनला अडकवलेल्या पिशव्यांचे मालकच नसायचे (आम्ही पॅड एका पिशवीत जमा करून मग सगळा पाच दिवसांचा कार्यक्रम संपला की जाळून द्यायचो). दहावीत आल्यावर जरा ज्यास्तच कळलं की कसं त्या प्लास्टिक च्या फ्युम्स आपल्यासाठी हानिकारक असतात वगैरे. आणि काही गमतीशीर समजही होतेच की साप कुत्री त्याचा वास घेऊन मागे लागतात वगैरे वगैरे… आत्ता काय करतात नवोदय वाले माहिती नाही. पण incinerator किंवा काही उपाययोजना करता आली तर चांगलंच. कित्येक वेळा तर उद्या दहावी बारावीचा पेपर आणि आम्ही हुशार माणसं काय करतोय तर पॅड जाळतोय असं होत.
6. शरमेच आयुष्य….. अहो "ब्लीडींग विथ प्राइड" असलं काही असू पण शकत ह्याची कल्पना पण नव्हती कधी डोक्यात. खरंच दुखलं तर मॅडम लोक नाटकं करतात हो पोरी असं सर लोकांना बोलायच्या. आणि अश्या वेळी खरंच cramp असणारी कोणीतरी सापडलेली असते तावडीत. कुठे डाग लागू नये. महिन्याची तारीख जवळ आली की आता सकाळी पीटीला होईल, असेंबली सुरू असताना, बापरे मॅथच्या पीरेड ला तेवढं वाचवं रे देवा, कधी कधी मेस मधून पण अर्धपोटी पळून जायची वेळ आलेली… कधीच सांगून येत नाहीत पिरेड्स आणि असं वाटायला लागतं की हा आत्ता बरोबर हाती लागलीय आपली सायकल आपल्या की तिन दिवस अधिच नाहीतर चार दिवस लेट झालेली असतेच तुमची पाळी.
खूप गोष्टी आहेत. ज्या वाटत नसायलाच हव्या होत्या आयुष्यात. जागाच नवती त्यांची. ज्या नैसर्गिक कृतीने एक स्त्री नवीन जन्म देण्यासाठी सक्षम होते त्या गोष्टीची लाज का असावी मनात? माहिती आहे मला काही काही घरी मोठे कार्यक्रम होतात. पण तो कार्यक्रम कशाचा कशासाठी ह्याचं उघड उघड बोलणं ऐकल्याचा एखादा तरी किस्सा आठवतोय का कोणाला? मेडिकल स्टोअर मध्ये लाजेन विचारणं की आहे का हे तुमच्याकडे आणि त्याने किंवा तिने पण ते तितक्याच संकोचाने एका काळया पिशवीत घालून तुम्हाला देणे. ते लोणच्याचे किस्से, देवाऱ्या जवळ नको जाऊ, अग निवदाला हात लावलास… सगळ्यांच्याच वाट्याला नसेल, नाही येत पण का जाणे वाचणाऱ्या अल्मोस्ट सगळ्यांना कुठेतरी काहीतरी झळ लागली असेल असच वाटतंय…
खूप खूप गोष्टी आहेत. आठवीत असल्यापासून आणि पाहिले सहा महिने सोडले तर प्रत्येक महिन्याचे, नव्हे माझ्या menstrual cycle नुसार प्रत्येत २८ दिवसातील 3 दिवस हे रक्तस्त्राव बघण्यात आणि cramps सहण करण्यात गेलेत. प्रत्येक वेळचे किस्से तर आता आठवत ही नाहीत, आणि ते चांगलंच म्हणायचं. मागच्या महिन्यात रात्री झोपताना पिरेडस आले आणि गजब दुखत होते पोट, पाट, पाय, डोकं आणि आई होती कुशीत घ्यायला. आपलं एवढं fragile नाजूक असणं अश्या वेळी छान वाटतं.
आज खूप काही… खूप खूप काही बदललंय. मला मनात खंत नाही की लाज नाही. येस आई ब्लीड, आणि मला हे कोणापासून लपवून ठेवण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज नाही. बाबा समजतात आणि झोप लागत नसेल तेव्हा थोपटतातही. भैयाशी संवाद करणं कठीण जातं कारण socialisation. पण मी बोलते कारण मी त्याच्या आयुष्यावर इम्पॅक्ट करणारी महत्त्वाची व्यक्ती आहे आणि कुठेतरी ह्याणेच त्याचा दृष्टीकोन बनतोय. शाळांनी खूप काही अधुर सोडलय, आज वाचून कोणकोनाला उगाच वाटेल अरे काय कश्या करायच्या पोरी सगळं मॅनेज… खरंतर तेच पोरींसारख रहा, स्वताला काय समजता, समाजात राहायचं, मन नाहीत दुखवायचे असं काही बाही सांगून बिंबण्यात येतं ना मनावर.
Let's talk and let's empower! It's not easy when you haven't seen it happening that regularly and without hesitation. It was difficult for me too. But thanks to myself that I questioned it and I question it even now. मी भरलेत कित्येक निवद घरी आईला हे विचारत की बाई देवांनातर माहिती असेलच कशे जन्माला आलेत ते. बोलत रहा, लोकांना बोलतं करा. आज कित्येक गोष्टी मी घरी सांगत होते खरंतर आईला. पटवून देत होते की माहितीच नसतं कित्येक नवऱ्यांना बायकोला आज भाकऱ्या थापताना हात पण उचलवत नव्हते. मी thank you म्हणाले बाबांना की माझं ऐकून घेतलं, ऐकून घेतात… मी स्टोरी पोस्ट करते की माझे भाऊ, मित्र बघतील आणि पुन्हा त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या female colleagues, friends किंवा कोणी अनोळखी स्त्री मुलगी जरी आली तर मनात एक जाणीव राहावी त्यांच्या…
To sum it all up… Girls! Its nothing to be ashamed of. Boys! Talk, ask, know about it. Probability is 1 woman out of 5 in your Life is bleeding right now… एक गम्मत आली डोक्यात की कधी तुम्हाला वाटत असेल ना की कसा आहे हा तर त्याच्याशी menstruation बद्दल बोलायला सुरू करा… it will help you in making right choice...
प्राजक्ता प्रकाश
Comments
Post a Comment