तो आणि मी
तो अचानकच येतो
सांगून येणं
चाहूल लागू देणं
त्याची सवय नव्हे
आज ही तो असाच आला
न सांगता
मला शिडशिडी आणायला
आणि बहरवून गेला
मन आणि मौसम
गडगडाट भावनांचा धुवून गेला
प्रसन्नतेच्या चांदण्या शिंपून गेला
हिरवळ स्वच्छंदतेची
पालवी आशेची
कोरडी मने लिंपून गेला
तो असाच येतो
मन कोरडं झालं की
थेंबे थेंबे ओलावा भरतो
हलकी झुळून बनून
कुठे कुठे स्वैर करवतो
आज चिंब भिजणं नाही झालं
तुझ्या संगे तल्लीन होऊन
विरघळून जाणं नाही झालं
पण तुझा अट्टाहास मोठाच
किती वेळ बरसत राहिलास
माझ्या हातच्या पुस्तकाला
हिनवत राहिलास
जिंकलास तू आजही
पण मला हरू न देता
असंख्य आपल्या भेटिंना
नव्याने गुंफता गुंफता
प्राजक्ता प्रकाश
ऑगस्ट २०१९
Comments
Post a Comment